खुन्नस दिल्याच्या रागातून डोक्यात मारली फरशी, खूनाचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तु काय मोठा भाई झालास का, डोळे फाडून का बघतोय असे म्हणत पुर्ववैमनस्यासह खुन्नसीच्या रागातून तरूणाच्या डोक्यात फरशी मारून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना 31 डिसेंबरला उत्तमनगरमध्ये घडली. याप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कार्तिक शर्मा (वय 21 रा. मासेआळी, उत्तमनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव गणेश धावडे (वय 22 ) आणि प्रसाद नवनाथ कोळी (वय 22 दोघेही रा. उत्तमनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला कार्तिक त्यांच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी आलेल्या गौरव आणि प्रसादने त्याला तु काय मोठा भाई झालास का, आमच्याकडे डोळे फाडून का बघतोय असे म्हणत शिवीगाळ केली. त्याला मारहाण करीत फरशी डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.