गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या मराठी संगीत नाटकातील नाटय़ गीतांचा नजराणा असणारा ‘स्मृती सुगंध’ हा कार्यक्रम शनिवार, 14 जानेवारीला संध्याकाळी 4.00 वाजता रवींद्र नाटय़मंदिर, पु. ल. देशपांडे अकादमी, मिनी थिएटर, 3 रा मजला, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सुभाष सराफ यांची असून कार्यक्रमाला माजी पेंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, उद्योगपती अनिल खवंटे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. गायक कलाकार श्रीरंग भावे, नूपुर गाडगीळ, श्रिया सोंडूर बुवा असून साथीला साई बँकर (तबला), निरंजन लेले (ऑर्गन) तर मुपुंद सराफ, प्रतिभा सराफ यांचे निवेदन असणार आहे. कार्यक्रमाचे तांत्रिक साहाय्य विश्वास महाशब्दे, समन्वयक शीतल करदेकर आणि सूत्रधार रवींद्र ढवळे आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.