सचिन म्हात्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी पूर्व येथील दोसीबाई जीजीभॉय हायस्कूल या शाळेतील इंग्रजी विषयाचे उपक्रमशील शिक्षक तसेच ब्रिटिश काwन्सिलचे इंग्रजी विषयाचे मुख्य मार्गदर्शक सचिन म्हात्रे यांना यंदाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानचा जलदगतीने अध्ययन  प्रकल्प,  समग्र शिक्षा अभियान प्रकल्प, ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टीचर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये प्रबंध सादरीकरण, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चंद्रपूर अभ्यास दौऱयातील सदस्य, एससीईआरटीच्या विविध प्रकल्पांमधून इंग्रजी कार्य पुस्तिकेचे विकसन सदस्य, इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक  लेखक याद्वारे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन इत्यादी विविध उपक्रमांमधून सचिन म्हात्रे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.