
वृत्तपत्र विव्रेत्यांना भेडसावणाऱया समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्वासन शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. अंधेरी वृत्तपत्र विव्रेता सेनेचे 22 वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल येथे शिक्षणमहर्षी अजय काwल यांच्या सहकार्याने पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
जगन्नाथ कोठेकर यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली, त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतले आणि वृत्तपत्र विव्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे सांगितले. तेव्हापासून मी वृत्तपत्र विव्रेत्यांशी जोडलो गेलो आहे. भविष्यात वृत्तपत्र विव्रेत्यांच्या तीन महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सुभाष देसाई यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विजय रावराणे, नाना निरवडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोळी समाजाचे मुंबई अध्यक्ष प्रदीप टपके, बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे सरचिटणीस संजय चौकेकर, रवींद्र चिले, विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, जयवंत डफळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश पोवार, हरेश भेदा, एस. मुरगन, सचिन खांडेकर, श्रीकांत कळसकर, राजन यादव, उतेकर, महेंद्र तांडेल, प्रशांत गवाणकर निंबाळकर, सुनील चव्हाण यांनी परिश्रम घेतले.






















































