‘गोष्टी पलीकडचे महाभारत’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरारी प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा यांच्या वतीने स्वाती काळे लिखित ‘गोष्टी पलीकडचे महाभारत’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि विश्वातील 10 आदर्श शिक्षिका या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा 6 जानेवारीला प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत संध्याकाळी 6 वाजता मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ‘गोष्टी पलीकडचे महाभारत’ या स्वाती काळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षण आणि मराठी भाषामंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी साहित्यिक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, धर्मशास्त्र्ा, पुराभिलेख विद्या, भारतीय स्त्र्ााrवाद व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक डॉ. प्राची मोघे, लोकसाहित्य व लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पेंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी मुद्रा कलानिकेतनच्या डॉ. वृषाली दाबके आणि सहकलाकार कथ्थक नृत्य सादर करतील.