महापालिका निवडणुका मे महिन्यात होतील, शरद पवार यांचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा कारभार सध्या प्रशासक पाहत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्यात होतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. बहुतांश ठिकाणी प्रशासकच हा सर्व कारभार पाहत आहेत. निवडणुकांबाबत न्यायालयाच्या आदेशाची सर्व पक्ष वाट पाहत आहेत. मात्र, थेट मे महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती शरद पवार यांनी पुण्याच्या पक्षाच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले.