
दिल्ली-पाटणा इंडिगो फ्लाइटमधील दोन मद्यधुंद प्रवाशांना पाटणा विमानतळ पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CISF) मदतीने रविवारी संध्याकाळी देशांतर्गत उड्डाणसेवेत मद्यपान केल्याबद्दल अटक केली. असा हवाई प्रवास करणं प्रतिबंधित आहे. सूत्रांनी सांगितले की, विमानात कोणताही गोंधळ झाला नाही आणि क्रू सदस्याने हस्तक्षेप केल्यावर प्रवासी थांबले आणि माफी मागितली.
प्रोटोकॉलनुसार, एअरलाइनने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली आणि पोहोचल्यावर त्यांना अटक करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीहून प्रवासी विमानात चढले तेव्हा दोन्ही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते आणि 80 मिनिटांच्या विमान प्रवासात त्यांनी मद्यपान सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.
CISF ने त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
नागरि हवाई वाहतूक नियामक महासंचालनालय (DGCA) च्या सूत्रांनी म्हटले आहे की, यामुळे CISF च्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘हे लोक बिअरचे डबे घेऊन कसे आत आले?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानामध्ये एका महिलेवर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा याच्यावर कारवाई करण्यात सहा आठवड्यांच्या विलंबामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सोशल मीडिया युझर्सने एअरलाइनने केलेल्या घटनेच्या हाताळणीबद्दल नाराजी व्यक्त केली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी नंतर कबूल केले की एअर इंडियाची कारवाई अधिक वेगवान असायला हवा होता. चंद्रशेखरन यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही ही परिस्थिती ज्या प्रकारे व्हायला हवी होती त्या पद्धतीने हाताळण्यात आम्ही कमी पडलो.’
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनीही माफी मागितली होती आणि सांगितले होते की चार केबिन क्रू आणि एक पायलट डी-रोस्टर करण्यात आले होते आणि एअरलाइन त्यांच्या ‘फ्लाइटमध्ये अल्कोहोल सेवेच्या धोरणाचे’ पुनरावलोकन करत आहे.

























































