
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पदाची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांवर कर्नाटकातील लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
विशेष म्हणजे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सांगलीतील गावांवर दावा केला होता. तसंच, सीमाभागातील काही भागावरही आपला दावा सांगितला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने ठरावही मांडला आहे.


























































