Video – बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहरुख खान अभिनित पठाण या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या बेशरम रंग या गाण्यावर आधीच वाद ओढवला होता. त्यानंतर चित्रपटात बरेच बदलही करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या ट्रेलरमध्ये चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट यशराजच्या पठडीतला दिसत असून त्यात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्य अभिनेता शाहरुख खान याच्यासह दीपिका पदुकोण ही देखील यात स्टंट्स करताना दिसत आहे. यांच्या जोडीला जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा हेही दिसत आहेत. चित्रपटात व्हीएफएक्सचा वापरही करण्यात आला आहे.

आदित्य चोप्रा यांची निर्मिती असून या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर –