रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मध्य रेल्वे आपल्या स्थानकांवर बीएआरसीच्या सहकार्याने अल्ट्रा-फिल्ट्रेशन मेम्ब्रेन युनिट उभारणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे आणि बीएआरसीमध्ये करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सँडहर्स्ट रोड स्थानकात प्रत्येकी एक तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी चार युनिट लावण्यात येणार आहेत. भाभा अणु संशोधन केंद्राच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱया अल्ट्रा-फिल्ट्रेशन मेम्ब्रेन तंत्रज्ञानाच्या युनिटमुळे पाण्यातील मायक्रोबियल दूषितता, टर्बिडिटी, क्षारता, फ्लोराईड, आर्सेनिक, लोह आणि इतर दूषित घटक काढून टाकणार आहे. त्यामुळे सदरचे पाणी बीआयएस मानकाप्रमाणे पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित होणार आहे. .