लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जोगेश्वरी येथील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव पटेल असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

वैभव हा जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात राहत होता. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. दीड महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली होती. तेव्हापासून तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी त्याने जोगेश्वरीच्या लोखंडवाला येथील एका लॉजमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली. मंगळवारी दुपारी त्याला रूममधून चेक आउट करायचे होते. चेक आउटसाठी मॅनेजरने वैभवच्या रूममध्ये फोन केला. मात्र वैभव फोन उचलत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मॅनेजरने याची माहिती ओशिवरा पोलिसांना दिली.

काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. लॉजमधील वेटर हा मागच्या बाजूने आत शिरला. तेव्हा वैभवने इस्त्र्ााrच्या वायरने गळफास लावून आत्महत्या केली होती. घटनास्थळी पोलीस पंचनामा करत होते. तेव्हा वैभवच्या मोबाईलवर एकाचा फोन आला. त्यावरून वैभवची ओळख पटली. पोलिसांनी वैभवच्या अपघाती मृत्यूची माहिती त्याच्या नातेवाईकांना कळवली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.