
चंद्रपुरातील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुर क्षेत्रातील, येनोली माल बिट, कक्ष क्रमांक 65, येनूली माल हद्दीत बिबट मृत अवस्थेत आढळल्याने वन विभागात खळबळ माजली आहे.
वाघाच्या हल्ल्यात मादा बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्रथम दर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादा बिबट आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहेत.
































































