महापुरुषांवरून विधानं करणाऱ्या भाजप नेत्यांचे राष्ट्रवादीने कान पिळले, ट्विटरवरून हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. तसेच अनेकदा भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देवी देवता व महापुरुषांसोबत तुलना केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेत्यांचे कान पिळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.

”पंतप्रधान मोदींसमोर छाप पाडण्यासाठी त्यांची देवाशी किंवा महापुरुषांशी तुलना करणाऱ्या भाजपा नेत्यांनी या महापुरुषांच्या आचरणाचाही आदर्श घेण्याची गरज आहे. महापुरूषांनी केलेल्या कामातून जनतेच्या हिताचे रक्षण झाले. मात्र मागील काही वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जनता अधिक त्रस्त झाली आहे. नोटाबंदी, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदे, जातीवाद अशा एक ना अनेक गोष्टींमुळे जनता हवालदिल आहे. आधी महापुरूषांचा आदर्श जपत जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे याचा विसर भाजपा नेत्यांनी होऊ देऊ नये”, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.