
14 जानेवारीला जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला सुमारे 47 वर्षे पूर्ण झाली. याच अनुषंगाने जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱया सीमा खंडागळे यांनी ‘पुणे किलिंग्स जक्कल केस’ या नावाने या घटनेबद्दल मराठीमध्ये पॉडकास्ट सादर केले आहे. या पॉडकास्टचे कथन सिद्धार्थ नाईक याने केले आहे तर संगीत सागर भिलारकर यांनी दिले आहे. या पॉडकास्टचा पहिला भाग स्पॉटिफाय, ऍमेझॉन म्युझिकवर उपलब्ध झाला आहे.
पॉडकास्टबद्दल सीमा खंडागळे म्हणाल्या की, राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, सुहास चांडक यांनी त्यांच्याच अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशांत हेगडे या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली होती. पुढील दीड वर्ष पुण्यात 10 खून होऊन या गुह्याचे सत्र थांबले. या हत्याकांडाबद्दल सखोल तपशील संशोधन करून या पॉडकास्टची निर्मिती करण्यासाठी तीन वर्षे लागली. पॉडकास्टमध्ये या गुह्यातील शोध प्रक्रियेतील त्रुटी, सीरियल किलिंग तसेच या गुह्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटना व देशातील आणीबाणी, बेरोजगारी इत्यादी गोष्टींवरसुद्धा प्रकाश टाकण्यात आला आहे.


























































