नगर जिल्ह्यात संवर्ग-3 मधील 191 शिक्षकांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी दोन वर्षांपासून कोविड आणि तिसरे वर्ष ऑनलाइन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेत आतापर्यंत ६६२ गुरुजींची बदली झाली आहे. शुक्रवारी संवर्ग-३मधील १९१ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, आता संवर्ग-४च्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया शिल्लक असून, येत्या आठ ते दहा दिवसांत ती प्रक्रियाही पूर्ण होणार आहे.

नगरसह राज्यात ३० नोव्हेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने गुरुजींच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली होती. यात जिल्ह्यातील संवर्ग-१मधील २९९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, पती-पत्नी एकत्रीकरण(संवर्ग-२)मध्ये १७२ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. मंगळवारी (१७ रोजी) संवर्ग-३मध्ये ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी ‘पेसा’(आदिवासी भागात)अंतर्गत किमान तीन वर्षे सेवा केली आहे, अशा २१८ शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होऊन शुक्रवारी (२० रोजी) बदली झालेल्या शिक्षकांची यादी ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. यात २१८ शिक्षकांनी अर्ज केलेले असताना पात्र असणार्‍या १९१ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, आता संवर्ग-४मधील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गांतील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

संवर्ग-३मध्ये राज्यभरातील ३०३८ शिक्षकांच्या बदल्या

 राज्यात ४३०० शिक्षक संवर्ग-३मधून बदलीसाठी पात्र होते. यातून तीन हजार ३८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. झालेल्या बदल्यांची टक्केवारी ७८ टक्के आहे. यात बुलढाणा ३९, धुळे १८, िंहगोली १७, वर्धा २, यवतमाळ ८४, जळगाव १३७, संभाजीनगर १८१, सांगली ६२, सिंधुदुर्ग १३५, वाशिम ३४, कोल्हापूर ७७, रायगड २३७, नगर १९१, नागपूर ५७, नांदेड १३०, पालघर २८३, ठाणे १२९, गोंदिया ३०, पुणे ३८२, सातारा १४५, रत्नागिरी २९९, चंद्रपूर

४१, अकोला ३५, नाशिक २२३, नंदुरबार ४८, अमरावती १६, गडचिरोली ६ असे बदल्यांचे प्रमाण आहे.

—