सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देण्यासाठी क्युआर कोडची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देता यावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युद्ध क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहीद झालेले, अपंगत्व आलेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांकरिता लागणारा खर्च ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उभारला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते.

ध्वजदिन निधीमध्ये देणगी देण्यात येणाऱ्या रकमेवर आयकर अधिनियम 1961 कलम 80 जी (5) (6)च्या अंतर्गत आयकर सवलत लागू आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.