शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भंडारा व गोंदिया जिह्यातील युवासेनेच्या जिल्हा युवा अधिकारीपदी नियुक्त्या केल्या आहेत. भंडारा जिह्याच्या जिल्हा युवा अधिकारीपदी पराग व्यंकटराव बोरकर यांची तर गोंदिया जिह्याच्या जिल्हा युवा अधिकारीपदी महेश दुंभरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.



























































