
प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना, नृत्यगुरू आणि संशोधक डॉ. कनक रेळे यांचे आज अल्पशा आजाराने विलेपार्ले येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. कनक रेळे यांनी मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्यप्रकाराला संजीवनी देत हजारो शिष्य घडवले. सुमारे आठ दशके शास्त्रीय नृत्याचा प्रसार, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या पार्थिवावर पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कनक रेळे यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. नृत्यशास्त्र्ााच्या अध्ययनासाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे या ध्यासाने प्रेरित होऊन 1966 साली नालंदा नृत्य संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर 1973 साली नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर त्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी नृत्य शास्त्राचे धडे दिले.
डॉ. रेळे यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मविभूषण सन्मान’ तसेच ‘कालिदास सन्मान’, ‘संगीत नाटक अकादमी’, ‘नृत्यचुडामणी’ अशा अनेक प्रतिष्ठsच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
































































