
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांना 16 फेब्रुवारी 2027पासून सुरुवात होणार आहे. दहावीची परीक्षा 9 मार्चपर्यंत पार पडणार आहेत. दहावीच्या एपूण 83 विषयांच्या परीक्षा होणार आहेत. तर बारावीची परीक्षा 9 एप्रिलपर्यंत चालणार असून बारावीसाठी 121 विषयांच्या परीक्षा होणार आहेत.
























































