एसी लोकलच्या ट्रेन मॅनेजरला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसी लोकलमध्ये महिलाच्या डब्यात झोपलेल्या प्रवाशाने वरिष्ठ ट्रेन मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत ट्रेन मॅनेजरच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार ट्रेन मॅनेजर यांची डय़ुटी बोरिवली एसी लोकलवर होती. एसी लोकल बोरिवली येथील फलाट क्रमांक 2 येथे आली. तक्रारदार हे उतरून जात असताना महिलांच्या कोचमध्ये एक जण झोपलेला दिसला. तक्रारदार त्या व्यक्तीला उठवण्यास गेले. त्याचा प्रवाशाला राग आला. त्याने तक्रारदाराच्या डोक्यात मोबाईल मारला. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.