जिओने आणले अनलिमिटेड डेटाचे प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववर्षाच्या स्वागतासाठी जिओने ग्राहकांना डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नसलेली खास भेट दिली आहे. पंपनीने ‘हॅपी न्यू इयर 2.0’ अंतर्गत अनलिमिटेड 4जी आणि 5जी डेटाचे नवे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा देणारा 399 चा नवा फ्लॅगशिप प्लॅन हे प्रमुख आकर्षण आहे. या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस काॅलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.

वारंवार रिचार्ज करण्याची गरज टाळू इच्छिणाऱया ग्राहकांसाठी जिओने 3,999 चा वार्षिक प्लॅन आणला आहे. एकदाच रिचार्ज केल्यावर तब्बल 365 दिवस अनलिमिटेड 4जी-5जी डेटा वापरता येणार आहे. या प्लॅनमध्येही मोफत व्हॉइस काॅलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. इतर जिओ प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही कंपनीने खास डेटा ऑफर आणल्या आहेत. काही काळासाठी अधिक डेटाची गरज असणारे ग्राहक 15 किंवा 25 चे अनलिमिटेड 5जी डेटा अॅड-ऑन घेऊ शकतात. 15 च्या पॅकमध्ये एका दिवसासाठी, तर 25 च्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल. रात्री उशिरापर्यंत गेमिंग, चित्रपट-मालिका पाहणे किंवा काम करणाऱया ग्राहकांसाठी 50 चा नाइट डेटा पॅकही सादर करण्यात आला आहे.