
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांच्या अंतिम जामिनाला शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आसाम आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी आपला जबाब दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितली आहे. त्यानुसार, सोमवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 3 मार्चपर्यंत वेळ दिला आहे तसेच पवन खेरा यांचा अंतरिम जामीन शुक्रवारपर्यंत वाढवला आहे.
पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी 23 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील लखनौ, वारासणी आणि आसाममध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही एफआयआर एकाच ठिकाणी एकत्र करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.



























































