खूनासह मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खून आणि मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. हांडेवाडी चौक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

आकाश शांताराम काळे (24, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. काळे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच, त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई केली. तेव्हापासून काळे हा फरार होता. दरम्यान कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना आरोपी काळे हा हांडेवाडी चौक परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून काळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, ज्योतीबा पवार, सागर भोसले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.