
तुमच्या कार्यशक्ती कमी झालेले असेल, तुम्हाला छातीमध्ये जळजळ, करपट ढेकर आल्यासारखे होत असतील, पोट साफ वेळेवर होत नसेल, डोकेदुखीचा वारंवार त्रास होत असेल, उठता बसता पायाचा कटकट आवाज येत असेल. किंवा बऱ्याच व्यक्तीचे हात पाय थरथर कापत असतील किंवा खायला नाही येत असतील तर तुमच्या बाबतीत घडत असेल तर या सर्व समस्यावर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आज फक्त तीन पदार्थ लागणार आहेत, त्यासाठी हा घरगुती उपाय ला सुरुवात करण्यापूर्वी आपण जो आहार घेतो हा आहार यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पित्ताचा त्रास लवकर कमी होण्यासाठी जागरण कमी करावे. आहार वेळेवर घ्यावा लागतो. सोबतच तो संतुलित असावा लागतो ज्याने आपलं पोट साफ होत नसेल तर पोट साफ होईल. त्यावेळी त्यांचे असंख्य प्रकारचे आजार कमी होते. पोट साफ, पित्ताचा त्रास शंभर टक्के कमी होईल पुढील उपाय करा. यासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ, आवळकंठी, सर्वांच्या परिचयाचे असा आहे. आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध असतो, आवळ्यात भरपूर प्रमाणात फायबर, विटामीन , कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं म्हणजे शरीराला आवश्यक घटक जे लागतात ते सर्व यामध्ये असतात. म्हणून आपणास या आवळ्याचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम आवळकंठी जी आहे तीची एकदम बारीक पावडर आपणास करायची आहे. , त्यानंतर लागणार आहे तो म्हणजे सुंठ, आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. शरिरातील असंख्य प्रकारचे आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. पाचन शक्ती मजबूत बनवते. इम्मुनिटी पावर वाढण्यासाठी, व्हायरल इन्फेक्शन असेल त्यावरती सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरते. आपल्या शरिरांमध्ये असणाऱ्या कोणत्याही प्रकारचा पित्तप्रकोप कमी होण्यासाठी सुंठ उपयोगी ठरतो. यामध्ये पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर.
इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खडीसाखर फायदेशीर ठरते. म्हणून या उपायासाठी खडीसाखरेचा एक तुकडा आपणास लागेल. बारीक केलेल्या चूर्णात खडीसाखर घालून हे तीनही पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहेत.
एकजीव केलेले हे मिश्रण एक चमचा सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतल्याबरोबर तुम्हाला हे खायचे आहे. त्यानंतर अर्धातास काही खायचं नाही आणि संध्याकाळी जेवणाच्यानंतर परत तुम्हाला हे चूर्ण घ्यायच आहे. असा हा उपाय करायचा आहे. लगेच परिणाम दिसून येतो परंतु हा उपाय तुम्हाला एक महिना करायचा आहे. एक महिना केल्यानंतर तुमची आयुष्यभराचे औषध पूर्णतः सुटणार आहे.
























































