कसब्याच्या फटक्यानंतर पुणे शहर भाजप कार्यकारिणीत बदल होणार? चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पराभव झाल्यानंतर आता भाजप एका बदलाच्या तयारीत आहे. पुणे शहराच्या भाजप कार्यकारिणीत लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून हे बदल मार्च महिन्याच्या अखेरीलाच होतील अशा चर्चा आहेत.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला.

या निवडणूक निकालानंतर पुणे शहर भाजपमध्ये मोठे बदल होणार आहेत. सध्या जगदीश मुळीक यांच्याकडे पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. हा बदल झाला तर आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं सध्या चर्चेत आहेत.