
>> सीए प्रशांत अपराज, वित्त सल्लागार
आर्थिक वर्षाची शेवटची तारीख 31 मार्च जवळ येतेय. आयकर हा आपल्या खर्चाचा प्रमुख भाग आहे. बहुतेक लोक कर भरणा आणि इन्कम टॅक्स रिटर्न संबंधित गोष्टी अगदी शेवटच्या क्षणी करतात आणि कराच्या पैलूबद्दल नियोजन आणि जागरूकता नसल्यामुळे अधिक कर, विलंब शुल्क, व्याज भरतात. या लेखाचा उद्देश कर चुकवणे नसून प्रभावीपणे करांचे नियोजन करणे आणि कर, व्याज, विलंब शुल्क किंवा दंडाच्या दृष्टीने प्रभावी कर नियोजनासह पैसे वाचवणे हा आहे. कार्यरत व्यावसायिक, कर्मचारी यांनी कर नियोजनाची काय तयारी करावी, याबद्दल आज जाणून घेऊया.
- तुमचे सर्व बँक स्टेटमेंट डाऊनलोड करा आणि वर्षभरात मिळालेल्या सर्व उत्पन्नाची यादी करा.
- तुमच्या प्राप्तिकर लॉगिनमधून 26 एएस स्टेटमेंट डाऊनलोड करा आणि कंपनीने मासिक आधारावर कापलेला एकूण टीडीएस 31 डिसेंबर 2022 पर्यंत 26 एएसशी जुळत आहे का ते तपासा. बहुतेक वेळा नियोक्ता पंपन्या मोठय़ा प्रमाणात टीडीएस रिटर्नची प्रक्रिया करतात आणि चुकीच्या पॅनमुळे त्यात तफावत असू शकते.
- टीडीएसमध्ये काही जुळत नसल्याच्या बाबतीत तुमच्या पंपनी/नियोक्त्याला कळवा जेणेकरून ते वेळेआधी ते सुधारू शकतील.
- भाडे, बँकेतील मुदत ठेवीतील व्याज, आवर्ती ठेव, लाभांश, शेअर्सची विक्री, म्युच्युअल फंड इत्यादींमधून तुमचे उत्पन्न तपासा, त्यानंतर त्या अतिरिक्त उत्पन्नावर काही देय असल्यास आगाऊ कर भरावा. कर देय 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास आगाऊ कर भरावा लागेल.
- आगाऊ कर भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. आगाऊ कर भरण्याचा हा अंतिम हप्ता आहे.
- जर तुम्ही जुन्या नियमानुसार तुमचा कर भरत असाल तर घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता, 80 सी गुंतवणूक वजावट, 80 डी मेडिक्लेम गुंतवणूक वजावट इत्यादींशी संबंधित सर्व पुरावे आणि कागदपत्रे तुमच्या वेळेपूर्वी सबमिट करा.
- तुम्ही इक्विटी लिंग सेविंग स्कीम म्युच्युअल फंड, इन्शुरन्स प्रीमियम, हाऊसिंग लोन मुद्दल, शिकवणी फी इत्यादी कलम 80 सी गुंतवणुकीची मर्यादा पूर्णपणे वापरली आहे का ते तपासा, 80 सीची मर्यादा रुपये 1.5 लाख, 80 डी वैद्यकीय विमा प्रीमियम रुपये 25 हजार (60 वर्षांवरील व्यक्तीकरिता 50 हजार) आणि 80 सीसीडी (1 बी) नॅशनल पेंशन स्किम 50 हजार.
- जर तुम्ही घरातील कोणतीही मालमत्ता किंवा मोठय़ा मूल्याचे शेअर्स विकले असतील तर त्या व्यवहारांवर तुमच्या कराची योजना करण्यासाठी वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी संपर्क साधा.
- तुमच्या आयकर लॉगिनमधून तुमचे वार्षिक माहिती विवरण) / कर माहिती विवरण डाऊनलोड करा आणि तुमच्याशी संबंधित नसलेले असामान्य व्यवहार तपासा. (31 डिसेंबर 2022 पर्यंत तुम्हाला अपडेट्स मिळतील.)
- कोणत्याही असामान्य व्यवहाराच्या बाबतीत इन्कम टॅक्स पोर्टलवर योग्य उत्तर देण्यासाठी तुमच्या सल्लागाराची मदत घ्या.
- जर तुम्ही काही देणगी देण्याची योजना करत असाल तर 31 मार्च 2023 पूर्वी करा आणि ट्रस्टकडून 80 सी देणगीची पावती आणि प्रमाणपत्र मिळवा.




























































