प्रलंबित मागण्यांसाठी टीचर्स असोसिएशनचे धरणे आंदोलन, अनेक जिल्हय़ांतून शिक्षकांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनकडून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित-न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी विविध जिल्हय़ांतून पूर्ण वेळ शिक्षक उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष प्रशांत आडमुठे, कोषाध्यक्ष गणेश टर्ले व राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांनी केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागातील दत्तात्रय नाईक, विजय गोईलकर, तनुजा कंठे यांनी परिश्रम घेतले.

व्यवसाय शिक्षण शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात यावे, नवीन राष्ट्रीय शिक्षण आराखडय़ानुसार सर्व व्यवसाय अभ्यासक्रमांत कालानुरूप बदल करण्यात यावेत, 42 दिवसांच्या संपकालीन रजा पुन्हा बहाल करण्यात याव्यात, विनाअनुदानित सेवा वरिष्ठ निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांना प्रतितास 500 रुपये इतका मेहेनताना मिळावा आदी मागण्या टीचर्स असोसिएशनकडून करण्यात आल्या आहेत.