अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘अवकाळीग्रस्त शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे’, ‘शेतकऱयांची वीज तोडणाऱया सरकारचा धिक्कार असो’, ‘सरकार तुपाशी शेतकरी उपाशी’, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयांवर येत मिंधे सरकारच्या विरोधात आजही जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस होता. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत शेतकरीविरोधी मिंधे सरकारचा निषेध केला.