
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांतील सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांच्या मदतीसाठी काहीना काही तरी वाटा उचलला आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस आणि ह्यांची चर्चाच चालू आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारला हाणला.
नाशिक येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, नाफेड कांदा खरेदीच करीत नाही, असे मी लोकांकडून ऐकले आहे. कांदा निर्यातीवर बंधने असता कामा नये, आधी ती बंधने काढा, मग काय करता येईल ते बघू, असेही त्यांनी खडसावले. हमीभाव मिळावा हेच आतापर्यंत आपण बोलतोय. खरे तर शासकीय एजन्सीने मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करायला हवा, असे त्यांनी सांगितले. योग्य भाव मिळण्यासाठी अनुदान द्या, खरेदी करा, नाहीतर आणखीन काही करा. पण, शेतकऱयांना मदत करा, असे त्यांनी ठणकावून सांगितले.



























































