
व्हॉट्सअॅप युजर्सना आता चॅट करताना आणखी मजा येणार आहे. कारण लवकरच व्हॉट्सअॅपवर 21 नवीन इमोजींचा समावेश होणार आहे. सध्या हे इमोजी बीटा टेस्टर्सकडे लाईव्ह करण्यात आले आहेत. जे लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होतील.
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी लवकरच 21 नवीन इमोजी अपडेट होणार आहेत. या नवीन इमोजीचे अपडेट 15.0 या अपडेटचा एक भाग आहे. याबाबतची माहिती wabetainfo या संकेतस्थळाने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपने लाईव्ह केले आहेत ते इमोजी आधीपासूनच थर्ड पार्टी किबोरर्डवर उपलब्ध होते. मात्र यूजर्स हे इमोजी दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकत नव्हते. अपडेट आल्यानंतर इमोजी लिस्टमध्ये 21 नवे इमोजी त्यात अॅड होणार. यापैकी हायफाय, वायफाय, तीन हार्ट हे इमोजी युजर्सना जास्त आवडू शकतात.

व्हॉट्सअॅप सध्या आणखी एका फिचरवर काम करत आहे. ज्याद्वारे अननोन नंबरवरुन येणारे फोन म्युट केले जाऊ शकतात. हा पर्याय सेटिंगमध्ये मिळेल, जे ऑन केल्यानंतर अननोन व्यक्ती फोन केल्यावर सायलेण्ट होईल. या फोनला कॉल लिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप लवकरच युजर्सना स्टेटसला रिपोर्ट आणि स्टेटसवर वॉईस नोट लावण्याची सुविधाही देण्यात आली आहे. युजर्स 30 सेकंदापर्यंत वॉईसनोट स्टेटसवर ठेवू शकतात. सध्या लोकं व्हिडीओ, फोटो, टेक्स्ट आणि GIF एवढेच स्टेटसवर शेअर करु शकतात.


























































