
अहमदाबाद येथे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज समारोप झाला असून हिंदुस्थानने मालिका 2-1 ने जिंकली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हिंदुस्थानने जिंकले होते, तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हिंदुस्थानी संघाने पहिल्या डावात 571 धावा केल्या. त्यामुळे हिंदुस्थानला 91 धावांची आघाडी मिळाली. मॅट कुहनेमनच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवशी पहिला धक्का बसला. ट्रॅव्हिस हेडने अर्धशतक झळकावले. मार्नस लबुशेनने 150 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे या मालिकेतील पहिले अर्धशतक होते. हेड 19 धावा करून बाद झाला. त्याचवेळी लबुशेन 63 आणि स्मिथ 10 धावा करून नाबाद माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 175 धावा केल्या.
शेवटचे सत्र सुरु झाल्यानंतर एक तासाच्या आतच हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांनी निकाल न लागल्यास सामना येथेच संपवण्याचा निर्णय घेतला.


























































