दुचाकी चोर टोळीतील चौघांना अटक; तीन दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोर टोळीतील चौघांना अटक केली आहे.चोरांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. महेश अण्णासाहेब गायकवाड (रा. शनिमंदिर रोड, राहता ता. राहता), निलेश दिलीप जाधव (रा. शनि चौक, राहता ता राहता), किरण चंद्रकांत जाधव (रा. संजय नगर, जोउर कुंभारी, ता. कोपरगाव), सोमनाथ किसन वरशिळ (रा. संजय नगर, जोउर कुंभारी, ता. कोपरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव सो. शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.