दापोली तालुक्यातील लाडघर येथे वणव्यात होरपळून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एका व्यक्तीचा वणव्यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी 13 मार्च रोजी दुपारी दापोली तालुक्यातील लाडघर येथे अनिल झगडे (वय 60) यांचा वणव्याच्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दापोली तालुक्यातील लाडघर येथे झगडेवाडी ते दवंडेवाडी परिसरामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. हा वणवा अनिल झगडे यांच्या जागेमधून पुढे भडकत गेला. अनिल झगडे हे बागेत काम करत असताना त्यांच्या आग भडकत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवारातील वनसंपदा वाचवण्यासाठी ते वणवा विझवण्यासाठी म्हणून धावपळ करू लागले. मात्र या वणव्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दापोली पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन अहवालानुसार अनिल झगडे यांचा वणव्यात भाजून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती दिली.