
बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी परीक्षेनंतर घरीच परत आली नाही. मुलीला पळून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या वडिलांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे की, त्यांची सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. बारावीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता. परीक्षा दिल्यानंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मित्र-मैत्रिणी सर्वांकडे विचारणा करण्यात आली मात्र कुठेही ती सापडले नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले म्हणन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




























































