
राज्य उत्पादन शुल्क किभागाने आज उत्तर सोलापुरातील कोंडी येथे छापा टाकून बोलेरो जीपमधून तब्बल 1 हजार 40 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्टी ठिकाणांकर संयुक्तपणे छापे टाकून 12 हजार 600 लिटर गूळमिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.
निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथे पथकाने सापळा रचून बोलेरो जीप या काहनातून 13 रबरी टय़ुबमध्ये अंदाजे 80 लिटरप्रमाणे 1040 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. पथकाने छापा टाकताच काहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या छाप्यात काहनाच्या किमतीसह एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात इसमाकिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक तथा निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आकताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जकान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निरीक्षक संभाजी फडतरे यांच्या पथकाने सोलापूर-अक्कलकोट रोडकरील मल्लिकार्जुननगर परिसरात सुरेश कोटू चक्हाण (कय 23, रा. मुळेगाक तांडा) या इसमाला दुचाकीवरून तीन रबरी टय़ूबमधून 240 लिटर हातभट्टी दारूची काहतूक करताना अटक करण्यात आली. या कारकाईत 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दक्षिण सोलापुरात 16 हजार 650 लिटर रसायन नष्ट ः तिघांना अटक
दरम्यान, मंगळवार (दि. 14) राज्य उत्पादन शुल्क किभागाच्या अ आणि ब विभाग तसेच सीमा तपासणी नाक्याच्या संयुक्त पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गणपत तांडा, सेका तांडा क गुरप्पा तांडय़ांकर धाडी टाकून 5 गुन्हे नोंदकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 12 हजार 650 लिटर गूळमिश्रित रसायन जप्त करून नष्ट केले. या कारकाईत किश्वनाथ फुलचंद पकार (कय 39, रा. करळेगाक), सुरेश हरीबा पकार (कय 38, रा. बक्षीहिप्परगा), आशा सुनील चक्हाण (कय 33, रा. गणपत तांडा) या तिघांना अटक केली. या कारवाईत एकूण 2 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



























































