
नगर जिल्हा परिषदेच 2023-24 चे मुळ अंदाजपत्रक रक्कम रुपये 48 कोटी रुपयांची असल्याची माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यामध्ये नव्याने 40 शाळा बीओटी तत्त्वावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, मनोज ससे, डॉ. संदीप सांगळे, भास्कर पाटील, पांडुरंग गायसमुद्रे, संजय कुमकर, राधाकिसन देवढे, शंकर किरवे, राजू लाकडूझोडे, योगेश आमरे, संजय आगलावे, भगवान निकम आदी उपस्थित होते
जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक हे मुख्यत्वेकरुन शासनाकडून मिळणारे उपकर, सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्काच्या रकमा व पाणीपट्टी उपकर इ. बाबींवर आधारित आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला येणे असलेल्या थकबाकीच्या रकमा वेळीच मिळाल्या पाहिजे याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. साधारणतः शासनाकडून महसूल विभागाची 8 कोटी रुपयांची बाकी येणे अपेक्षित आहे करण्यात आले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सन 2023 2024 मध्ये अपेक्षित महसुली जमा होणारा निधी पुढील प्रमाणे आहे.
स्थानिक उपकर/ वाढीव उपकर – 2 कोटी 50 लक्ष. मुद्रांक शुल्क 15 कोटी,. उपकर सापेक्ष अनुदान 2 कोटी, अभिकरण शुल्क – 30 लक्ष, गुंतवणुकीवरील व्याज – 11 कोटी 30 लक्ष. इतर जमा 7 कोटी 40 लक्ष असे एकूण महसुली जमा – 38 कोटी 50 लक्ष आहे. असे ते म्हणाले एकूण 38 कोटी 50 लक्ष रक्कम जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी प्राप्त होईल असा अपेक्षित अंदाज आहे.
जिल्हा परिषदेचे सन 2022-23 चे मुळ महसुली अंदाजपत्रक रक्कम रूपये 36 कोटी 69 लक्ष, सन 2022-23 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक रक्कम रुपये 38 कोटी 76 लक्ष व सन 2023-24 चे मुळ अंदाजपत्रक रक्कम रुपये 39 कोटी 13 लाख असून सदर अंदाजपत्रक रक्कम रुपये 46 लक्ष शिलकीचे आहे.
जिल्हा परिषदेने विभागांना वाटप केलेल्या अनुदानामध्ये प्रशासन 1 कोटी 29 लाख 63 हजार, सामान्य प्रशासन विभाग 93 लाख 81 हजार, शिक्षण विभाग 1 कोटी एकोणीस लाख, बांधकाम उत्तर 4 कोटी 28 लाख ,बांधकाम दक्षिण 6 कोटी 75 लाख, लघु पाटबंधारे विभाग 1 कोटी 6 लाख, ग्रामीण पाणीपुरवठा 3 कोटी 30 लाख, आरोग्य 77 लाख, कृषी 80 लाख, पशुसंवर्धन 1कोटी 29 लाख, समाज कल्याण 2 कोटी 54 लाख ,दिव्यांग कल्याण 60 लाख महिला बालकल्याण 1 कोटी 20 लाख, ग्रामपंचायत विभाग 8 कोटी 86 लाख अर्थ विभाग 1 कोटी 13 लाख असे विभागांना वाटप केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं
जिल्हा परिषदेस कोणतीही योजना घेताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे जिल्हा परिषदेस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 ची पहिली अनुसूची कलम 100 आणि 123 मधील योजनांचाच समावेश करावा लागतो.
समाजकल्याण विभाग 20 टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती 20 टक्के, महिला व बालकल्याण विभाग 10 टक्के, दिव्यांग कल्याण विभाग 5 टक्के, व ई- प्रशासनासाठी 0.05 टक्के अशा अनिवार्य बाबींसाठी तरतुद करावी लागते. त्यानुसार तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सर्व विभागांच्या सूचना लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून बजेट तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




























































