
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याची घटना समोर आली आहे. मोदींच्या रॅलीत एका तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गडबड झाली आहे. तरुणाने मोदींच्या दिशेने धाव घेतली असता पोलिसांनी तातडीने त्याला अडवले आणि ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून तरुणाची चौकशी केली जात आहे.






























































