डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होतोय, ‘हे’ तेल ठरेल गुणकारी, जाणून घ्या फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाचा ताण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली बऱ्याच जणांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असतो. यावर विविध प्रकारचे उपाय केले जातात. एका अभ्यासानुसार, या दुखण्यावर पेपरमिंट तेलाच्या वापरामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो. पेपरमिंट तेलाचा फक्त एक थेंब डोक्याला लावल्यास डोकेदुखी कमी व्हायला मदत होते याशिवाय, हे तेल ओटीपोटातील दुखणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता कमी करते. त्वचेपासून केसांपर्यंतच्या अनेक विकारांवर हे तेल गुणकारी आहे. पेपरमिंट तेल पुदिन्याच्या पानांच्या अर्कापासून तयार केले जाते. जाणून घेऊया, या तेलाचे इतरही अनेक फायदे.

पेपरमिंट तेलाचा वापर नैसर्गिक उपाय म्हणून केला जातो. यामुळे पोटफुगी, पोटदुखी, अपचन यावर आराम मिळतो. हे तेल शरीराला येणारी सूज , चिडचिड होणे अशा त्रासांवरदेखील फायदेशीर ठरते. पोटात येणारे क्रॅम्प कमी करण्यासाठीदेखील हे तेल उपयुक्त आहे. याशिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील स्नायूंना आराम करण्यास देखील मदत करते आणि त्याचा दाहक-विरोधी प्रभाव असतो, मात्र याचा वापर लहान मुलांच्या त्वचेवर करू नये, कारण यामुळे लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते.

डोकेदुखी आणि मायग्रेन
पेपरमिंट तेलाच्या वापरामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो. ज्यांना पदार्थ गिळण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी पेपरमिंट तेलदेखील फायदेशीर ठरू शकते.

मळमळ विरोधी पेपरमिंट तेल
पेपरमिंटचा वापर मळमळ थांबवण्यासाठीही केला जातो. जेव्हा मळमळल्यासारखे वाटत असेल, तेव्हा पेपरमिंट ऑइल इनहेल केल्याने मळमळ थांबते. याकरिता डिफ्यूझरचा वापर फायदेशीर ठरतो.

पचन सुधारते
पेपरमिंट ऑइलचा वापर फंक्शनल डिस्पेप्सियासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केला गेला आहे. यामुळे पोट फुगणे, अपचन आणि पोटदुखी हे त्रास दूर व्हायला मदत होते. संशोधनात असेही दिसून आले आहे की तेल ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता कमी करून इरेटेबल बॉल सिंड्रोम(irritable bowel syndrom)मध्ये मदत करू शकते. “नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थच्या अभ्यासानुसार, मेन्थॉल आतड्यांसंबंधी पडद्यावरील कॅल्शियमची हालचाल रोखून पोटातील उबळ कमी करू शकते आणि IBS रोखण्यास मदत करू शकते.”

दाह कमी करण्यास प्रभावी

हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील स्नायूंना आराम करण्यास देखील मदत करते आणि त्याचा दाहक-विरोधी प्रभाव असतो.

निरोगी केस आणि त्वचा
अनेकदा कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरलेले पेपरमिंट तेल जाड आणि लांब केसांच्या वाढीस मदत करते. हे टाळूला रक्त प्रवाह उत्तेजित करण्यास आणि खाज कमी करण्यास मदत करते. त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसह, ते केसातील कोंड्यावर उपचार करण्यासदेखील मदत करते. त्वचेची जळजळही या तेलाच्या वापराने कमी होते.