
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी बुधवारी एक पत्रकार परिषद बोलावली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होईल असे जाहीर केले. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केले जातील असे त्यांनी सांगितले.



























































