डोंबिवलीत रिक्षाचालकांची दादागिरी, प्रवाशाला केली मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

रिक्षाचालकांची मुजोरी थांबण्याचे नाव घेत नाहीय. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे, मारहाण करणे अशा घटना वाढत चालल्या आहेत. असाच एक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. प्रवासभाडे जास्त सांगितल्याने प्रवाशाने त्याचा जाब विचारला असता रिक्षाचालकाने त्याला मारहाण केली. एवढेच नाही तर रिक्षात ठेवलेल्या दांड्याने बेदम मारुन त्याला जखमी केले आहे. मुजोर रिक्षाचालकाचा हा प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

डोंबिवली पूर्व येथील स्टेशन परिसरातील इंदिरा चौकात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रिक्षाचालकाने प्रवाशाला जास्त प्रवासभाडे सांगितले. त्यामुळे प्रवाशाला हे प्रवासभाडे जास्त वाटल्याने त्याने त्याबाबत त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचतालकाने त्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर रिक्षात ठेवलेले दांडे बाहेर काढून त्या दांड्यांनी प्रवाशाला मारहाण केली. त्यामध्ये प्रवासी जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्रवाशाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.