संत्र गोड आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘या’ 5 सोप्या टिप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबट-गोड चवीचे फळ बऱ्याच जणांना आवडते. संत्र्याला सुपरफूड असेही म्हणतात, कारण संत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यामध्ये सोडियम, जीवनसत्त्वे ए आणि कॅल्शियम असते शिवाय जीवनसत्त्व सी हेही मुबलक असते. यामुळे आहारात संत्र्याचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. बाजारात गेल्यावर गोड संत्रीची निवड कशी करावी ? हा प्रश्न पडतो, काही संत्र हे फळ आंबट तसेच कडवटही लागू शकते. या चवीने अगदी नकोसे होते. असे होऊ नये याकरिता बाजारात गेल्यावर गोड संत्रीची निवड कशी करावी याविषयी काही सोप्या टिप्स पाहुया. यामुळे फक्त बघूनच संत्र गोड आहे की नाही हे ओळखता येईल.

– फळ हातात घेऊन हळूच दाबून पहा. जर संत्र लगेच दाबले जात नसेल तर फळ गोड आहे असे समजले जाते.

– संत्र्यावर काही वेळा तपकिरी रंगाचे ओरखडे दिसतात. याचा संत्र गोड आहे की नाही याच्याशी काहीही संबंध नाही. ते वाऱ्याचे डाग म्हणून ओळखले जाते. काही वेळ फळ वाऱ्याने झाडाच्या फांद्यांना आदळून असे डाग पडतात.

– संत्रीचे वजन तपासून पाहा. यासाठी हातात फळ घेतल्यावर एखाद्या टेनिस बॉल एवढे वजन जाणवले तर हे फळ गोड आहे असे समजावे. संत्रीचे वजन जास्त म्हणजे त्यात जास्त रस आहे, असे समजावे किंवा फळाच्या गंधावरूनही त्याच्या गोडीविषयी कळू शकते.

– संत्र्याचा रंग हा केशरी असावा. काही संत्र जास्त पिकल्यावर त्यांचा रंग हिरवट होत जातो. या दोन्हीपैकी अर्धवट हिरवा रंग आंबट संत्रीचा असतो.

– संत्र्याच्या वरच्या बाजूला खोलगट तळ असेल, तर ते संत्र गोड आहे, असे मानले जाते.

संत्र्यामध्ये जीवनसत्त्व सी असते. त्यामुळे हे लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये सायट्रिक अॅसिडसुद्धा असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या संत्र्याची चव काही आंबट-गोड असते, हेही लक्षात घ्यायला हवे.