
मराठी बिग बॉसचा विजेता आणि हिंदी बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा उपविजेता शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर शिव ठाकरेने 30 लाखाची एक कार घेतली. तसेच त्याने स्वत:चा एक कॅफेही सुरू केला आहे.
रोडीजपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शिव ठाकरेला बॉलिवूडमध्ये त्याचे करिअर करायचे आहे. त्यासाठी आतापर्यंत त्याने खूप स्ट्रगल केला आहे. याच स्ट्रगलविषयी सांगताना शिवने त्याच्यासोबत घडलेला एक कास्टिंग काऊचा किस्सा सांगितला आहे.
मी आराम नगर येथे एकाऑडिशनसाठी गेलो होतो. तिथे एक माणूस मला बाथरुममध्ये घेऊन गेला. त्याने मला तिथे मसाज सेंटर आहे असे सांगितले. ते ऐकून मला धक्का बसला. ऑडिशन आणि मसाज सेंटरचा काय संबंध आहे. तेवढ्यात तो मला बोलला ‘ऑडिशननंतर एक वेळा तू इथे ये. ते ऐकून मी तिथून बाहेर पडलो. तिथे कास्टिंग डायरेक्टर होता त्यामुळे मला कोणताही वाद घालायचा नव्हता. पण कास्टिंग काऊज हे कुणासोबतही होऊ शकते. त्यात स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही.” असे शिवने सांगितले.
शिवने त्याच्या सोबतचा आणखी एक किस्सा यावेळी सांगितला. ”एकदा एका महिलेने मला रात्री अकरा वाजता ऑडिशनसाठी बोलावले होते. मी इतकाही भोळा नाही. रात्री अकरा वाजता ऑडिशन्स होत नाहीत हे मलाही समजतं. त्यामुळे मी मला काम असल्याचे सांगत तिथे जास्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जाणं टाळलं”, असं शिव ठाकरेने सांगितले.






























































