नगर – निंबाच्या झाडाला गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुर येथील रहिवासी दगडु गुलाब शेख (वय 48) या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. शेख हे कर्जतला खाजगी शाळेत शिक्षक म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत होते. पाथर्डी तालुक्यातील तिनखडी फाटा ते टाकळीमानुर रोडवरील पारगाव फाट्याजवळ देवस्थानच्या इनामी जमिनीतील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन शेख यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

शेख यांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अजून निश्चित समजू शकले नाही. पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दगडू शेख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक ईश्वर गर्जे करीत आहे.