
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार शिपिंग कॉर्पोरेशन स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी प्रदीप बोरकर, कार्याध्यक्षपदी अरविंद बिरमोळे, सरचिटणीसपदी अरुण तावडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जगताप, अश्रू चिले, कोषाध्यक्ष शुभांगी ठाणेकर, उप-कोषाध्यक्ष संजीत कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली, तर चिटणीसपदी भागवत सकपाळ, उत्तम तटकरे, श्याम खरे, वासुदेव मिरजोळकर, अस्लम शेख, विनायक रावले, संतोष मेश्राम, लोकेश बोराडे, शशांक मोटे, सहचिटणीस शिरीष शेटय़े, यशवंत धुवाळी, शिरीष पवार, नंदकुमार कुरतडकर, सखाराम गुरव, सदस्य सुरेश पिळके, सुरेश कदम, जितेंद्र जाधव, अनिल सावंत, रतन पिळके, भिवाजी प्रभूपाटकर, गणेश खानविलकर, धनंजय गायकवाड, सिद्धार्थ जाधव, विनोद पाडळे, सलील कावले, अरुण भंडारी, अमित सरफरे, विनायक गोकर्ण, श्याम गुप्ता, संजय भोसले, अमोल तारी, निर्मलकुमार राऊत, सांस्कृतिक मंडळ – प्रमोद कुंभार, चंद्रकांत नाईक, महिला विभागप्रमुख प्रमोदिनी मलुष्टे, ऋता चोणकर, सुजाता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



























































