Stepwell collapse at Indore temple मृतांचा आकडा 35 वर, 18 भाविकांना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरामध्ये विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 भाविकाचा मृत्यू झाला असून 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्यापही काही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. रामनवमीमुळे दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली असतानाच मंदिरातील विहिरीचे छत कोसळून त्यात 50 हून अधिक भाविक अडकले. यात 35 भाविकांचा मृत्यू झाला असून 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

सध्या 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एक व्यक्ती बेपत्ता आहे. लष्कराचे जवान, एनडीआरएफ आणि एसडीआरफचे पथक त्याचा शोध घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इल्लयाराजा टी. (Ilayaraja T) यांनी दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेह नगर, सपना संगीता रोड येथे हवन सुरू असताना हा अपघात झाला. विहिरीच्या छतावर लोक बसले होते. वजनाने छत तुटले आणि लोक खाली पडले. हे मंदिर सुमारे 60 वर्षे जुने आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेला एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींवर सरकार उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून परिस्थिती जाणून घेतली.