
>> महेंद्र पाटील
तू अन् मी कधी कधी बोलताना खूप दूर निघून जायचो… तुझ्या, माझ्या मनाच्या कक्षेच्याही बाहेर. एकटक क्षितिजाकडे पाहत हरवून जायचो, तर कधी चांदण्या रात्र चांदण्यांकडे पाहत विचार करायचो. त्यांचं जग कसं असेल? त्यांना पण मन असेल का? त्या चांदण्यासुद्धा आपल्याकडे पाहून कध आपला विचार करत असतील का? दूरवर चालत गेलो तर कित लांब चालत जाऊ? असे वेगवेगळे वेडे प्रश्न मनात यायचे.
तुला इतिहास आवडायचा आणि इतिहासातल्या व्यक्तिरेखासुद्धा. कधी कुणाच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करायचो, तर कधी समुद्रकिनारी वाळूचं घर बांधत बसायचो. एकदा अशाच एका संध्याकाळी आपण वाळूचं घर बांधलं आणि त्यात हरवून गेलो. बोलता बोलता सहज विषय निघाला की, जर आपण एकत्र येऊ शकलो नाही तर? बोलता बोलता या प्रश्नांनी व्यापक भीतीचं स्वरूप धारण केलं. मनात भीतीचा कल्लोळ माजला होता, पण तरीही त्यावर आपण बोलू लागलो. सगळय़ा शक्यता पडताळून पाहू लागलो. दूर गेल्यावर पुन्हा कधी समोर येऊ का? आलोच तर त्या प्रसंगाला कसे सामोरे जाऊ, एकमेकांविना कसे राहू, विरह कसा सहन करू, आठवणींचा आधार कसा घेऊ, समोर आल्यावर कोणत्या नजरेने एकमेकांकडे पाहू, वगैरे वगैरे…
विचार करत खूप दूर गेलो आपण. डोळय़ातून धारा वाहू लागल्या तेव्हा मी तुझे डोळे पुसायला गेलो अन् तू माझे. नुसत्या कल्पनेने इतके दुःख झाले की, प्रत्यक्षात दूर गेल्यावरही तितके झाले नसेल. मग आपण भानावर आलो आणि गंमत म्हणून सुरू झालेला तो विषय बंद केला. स्वतला सावरलं, पण घरी परतताना मनाला खूप हुरहुर लागून राहिल होत. अचानक भत वाटू लागल आणि मनात विचारांचा जवघेणा खेळ सुरू झाला. जे विचार केले, ते जागेपण पाहिलेले एक वाईट स्वप्न समजून विसरून जायचे ठरवले, पण कधी कधी नियत आपले विचार खरे करते आणि नेमकं जे वाटत नसतं तेच होतं. आपल्याही बाबतीत तेच झालं. नियतने खरोखरच आपल्याला दूर करायचं ठरवलं होतं आणि नुसतंच ठरवलं नाही, तर कायमचं वेगळं करून मोकळीही झाली ती.
तुझ्याविना मी आता एकटा राहिलोय. तेव्हा केलेले विचार एकेक करून माझ्या भोवती जमा झाले आहेत. आपली ओळख पटवून देऊ लागले आहेत. मी त्यांना जोडीला घेऊन पुन्हा सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो आहे. या प्रयत्नात तुझ्या दूर जाण्याचं दुःख कमी होत चाललंय असं मला वाटू लागलंय. आपण केलेले विचार, तेव्हा आपल्याला झालेला त्रास, डोळय़ात दाटून आलेलं पाणी… पण आज असं अचानक एकमेकांपासून दूर गेल्यावर वाटतं, या सगळय़ासाठी कुठे वेळ आहे? आयुष्यातले ते चार क्षण आपण एकमेकांमध्ये जगलो, त्या क्षणांचा खूप विचार केला. त्या विचारांन खरं तर एक प्रकारे आपल्या दोघांच्या मनाच जणू काही तयारीच करून घेतल होत. रंगत तालम, दूर जाण्याच…



























































