सिक्कीममध्ये हिमवादळाचं थैमान; 6 जणांचा मृत्यू, 80 जण बर्फाखाली दबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीमच्या सोम्गो प्रांतात एका हिमवादळाने थैमान घातलं आहे. या हिमवादळामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिमवादळामुळे प्रवासी बस दरीत कोसळून त्या अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले. या वादळाने वाहून आणलेल्या बर्फाखाली 80 जण दबले गेले आहेत. त्यातील 22 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

मंगळवारी या प्रांतात हिमवादळ आलं. त्या वादळामुळे एक प्रवासी बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या अपघातात चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. या वादळामुळे 80 जण बर्फाखाली दबले गेल्याचं वृत्त आहे. स्थानिक आणि सिक्कीम पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.