
>>प्रवीण धोपट
स्टॉक मार्केटमध्ये अनिश्चितता हीच गोष्ट निश्चित असते. त्यातही इंट्राडे ट्रेडिंग हे अधिक बेभरवशाचे समजले जाते. अशा अनिश्चित वातावरणात ट्रेडरने काय करावे याचा निर्णय घेण्यासाठी इंडिकेटर्स मदत करतात.
इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एखादा शेअर किंवा इंडेक्स कोणत्या प्राईसला ओपन होईल, प्राईस वाढेल, कमी होईल की आहे, त्याच किंमतीला स्थिर राहील, याबद्दल कोणताही अंदाज वर्तवता येत नाही. अशा अनिश्चित वातावरणात ट्रेडरने काय करावे याचा निर्णय घेण्यासाठी इंडिकेटर्स मदत करतात. आज प्रत्येक ब्रोकरच्या सॉफ्टवेअरमध्ये किमान अडीचशे इंडिकेटर्स असतात. हे इंडिकेटर्स विनामूल्य असतात. प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार आणि अनुभवानुसार त्याचा वापर करीत असतो.
विनामूल्य उपलब्ध आहेत म्हणून एकाच वेळी अधिक इंडिकेटर्सचा वापर करणे हेही जोखमीचे ठरते. लॉंगटर्म, स्विंग आणि इंट्राडे ट्रेडिंगसाठी, वेगवगळ्या टाईमप्रेमसाठी वेगवेगळ्या इंडिकेटर्सचा वापर करणे योग्य असते. याचा अर्थ विनामूल्य आहेत म्हणून इंडिकेटर्सचा अतिवापर करणे धोक्याचे ठरु शकते.
इंट्राडे ट्रेडिंगसाठी महत्वाचे आणि हमखास वापरले जाणारे काही इंडिकेटर्स आहेत. त्याची माहीती या लेखात देत आहे. मॉक किंवा पेपर ट्रेडींगसाठी त्याचा वापर करून अनुभवांअंती ते वापरायला हरकत नाही.
मुव्हिंग ऍव्हरेज (एमए) – ट्रेंड आयडेंटीफिकेशन आणि एन्ट्री एक्झीट ठरवण्यासाठी याचा वापर केला जातो. सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज, एक्स्पोनेंशिअल मुव्हिंग ऍव्हरेज आणि वेटेड मुव्हींग ऍव्हरेज यापैकी कोणताही एक मुव्हिंग ऍव्हरेज वापरावा.
रिलेटीव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय)- याला मोमेंटम ऑसिलेटर म्हणूनही ओळखले जाते, जो प्राईसमधला बदल आणि वेग मेजतो. शेअरची ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड स्थिती आयडेंटीफाय करून ट्रेंड रिव्हर्सल इंडिकेशनही देतो. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये याची लोकप्रियता अधिक आहे.
व्हॉल्यूम – शेअर्स किंवा कॉन्ट्रक्ट्सची संख्या इंडिकेट्स करण्याचं काम व्हॉल्यूम इंडिंकेटर करतो. ट्रेडरची संख्या आणि प्राईसची स्ट्रेंथ याचा अंदाज या इंडिकेटरमधून मिळतो. प्राईस रिव्हर्सल पॅटर्न म्हणूनही व्हॉल्यूमचा वापर केला जातो.
मुव्हिंग ऍव्हरेज कन्हर्जन्स डायव्हरजन्स (एमएसीडी) – इंट्राडे ट्रेडर्समध्ये अधिक प्रसिध्द असलेला हा इंडिकेटर ट्रेंड रिव्हर्सलसाठी उपयोगात आणला जातो. हा इंडीकेटर मार्केटची बुलीश किंवा बेअरीश स्थिती दाखवून बाय किंवा सेल सिग्नल जनरेट करतो.
कँडलस्टीक पॅटर्न्स – जॅपनीस कँडलस्टीक पॅटर्न्स हा इंट्राडे ट्रेडिंगमधला सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. प्राईसची मुव्हमेंट लक्षात येण्यासाठी, ट्रेंड रिव्हर्सलची माहीती मिळवण्यासाठी, बुलीश किंवा बेअरीश सिग्नलसाठी आणि मार्केटमधले सेंटिमेंट कळण्यासाठी कँडलस्टीक पॅटर्न्सचा वापर होतो.
अंदाजाने चाचपडत चालण्यापेक्षा हे इंटिकेटर्स म्हणजे आधाराची काठी आहेत असे समजावे. अनुभव आणि सराव याच्या आधाराने कोणता इंडिकेटर्स आपल्याला अधिक सहाय्य करतो याचा अंदाज ज्याने त्याने घ्यायचा असतो.
(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)


























































