कॉपी पकडल्याने विद्यार्थिनीने प्रवरा नदीत मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील बेलापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीची कॉपी पकडल्याचा राग आल्याने तिने पुलावरून प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला सुखरूप बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक अकरावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कॉपी न करण्याची सामूहिक सूचना दिली. दरम्यान, वर्गात एका विद्यार्थिनीची पर्यवेक्षकाने कॉपी पकडून तिला समज देण्यात आली. मात्र, या विद्यार्थिनीचा राग अनावर झाल्याने तिने उत्तरपत्रिका फाडली आणि थेट पळत जाऊन तिने लगतच्या पुलावरून प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु सुदैवाने नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला सुखरूप बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.