
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगातून देशावासीयांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सिसोदिया यांनी पत्राची एक प्रत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवली होती. ती प्रत केजरीवाल यांनी ट्विट केली आहे. या पत्रात सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हटले की, ‘देशाच्या प्रगतीसाठी हिंदुस्थानला सुशिक्षित पंतप्रधानाची गरज आहे’. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत.
गलिच्छ नाल्यात पाईप टाकून घाणेरड्या वायूपासून चहा किंवा अन्न बनवता येते असे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून वेदना होतात. नाल्यातील गलिच्छ वायू चहा आणि अन्न बनवण्यासाठी वापरता येईल का? अर्थातच नाही. कधी पंतप्रधान म्हणतात की ढगांच्या मागे उडणारी विमाने रडार पकडू शकत नाहीत, ते जगभरात हास्याचे पात्र बनतात. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांची चेष्टा करतात’.
ते पुढे म्हणतात, ‘मी एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की मी तितका सुशिक्षित नाही. ते म्हणाले की त्यांचे शिक्षण गावातील शाळेत झाले आहे. कोणी अशिक्षित आहे की कमी शिकलेला आहे हे सांगणे ही अभिमानाची भावना आहे का?’
मनीष सिसोदिया ने जेल से देश के नाम चिट्ठी लिखी –
प्रधानमंत्री का कम पढ़ा-लिखा होना देश के लिए बेहद ख़तरनाकमोदी जी विज्ञान की बातें नहीं समझते
मोदी जी शिक्षा का महत्व नहीं समझते
पिछले कुछ वर्षों में 60,000 स्कूल बंद किए
भारत की तरक़्क़ी के लिए पढ़ा-लिखा पीएम होना ज़रूरी pic.twitter.com/VpPyY1Jr2v
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 7, 2023
पंतप्रधान मोदींवर टीका करताना सिसोदिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘देशातील तरुण आज महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना काहीतरी साध्य करायचे आहे. ते संधी शोधत आहेत. त्यांना जग जिंकायचे आहे. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात चमत्कार करायचे आहेत. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता सुशिक्षित पंतप्रधानांमध्ये आहे का?’
देशभरात 60 हजार शाळा बंद करण्यात आल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
‘एकीकडे, लोकसंख्या वाढत आहे आणि सरकारी शाळांची संख्याही वाढली पाहिजे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारता आला, तर पालक त्यांचे वॉर्ड खासगी शाळांमधून काढून त्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतात, जसे दिल्लीत पाहायला मिळाले’, असे ते म्हणाले.
‘पण सरकारी शाळा बंद करणे धोकादायक आहे. सरकार शिक्षणाला प्राधान्य देत नाही हेच यावरून दिसून येते. जर आपण मुलांना चांगले शिक्षण देऊ शकलो नाही तर देशाची प्रगती होईल का? कधीच नाही!’, असे त्यांनी ठणकावले.
























































